*कोंकण Express*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे सामर्थवान एनसीसी ऑफिसर
अमोल शेळके सर*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत एनसीसी विभाग फार पूर्वी पासून आपल्या स्वकर्तृत्वाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात लौकीक प्राप्त केलेला आहे . निटनेटकेपणा शिस्त आणि राष्ट्र प्रेम या मूल्यांचे जतन सतत करणारे प्रारंभीचे ऑफिसर आदरणीय राऊळसर प्रचंड शिस्तीचा भोक्ता स्वतः प्रथम शिस्त लावून घेऊन संपूर्ण शाळेला कडक शिस्त लावणारे आदर्श एनसीसी ऑफिसर होऊन गेले नंतर विज्ञान विषयाचे श्री खोत सर यांनी विद्यामंदिरची एनसीसी प्रथम श्रेणीत नेऊन सोडली नंतरच्या काळात अमोल शेळके सरांनी एनसीसी विभागाचे नेतृत्व स्वीकारले तरुण उमदे नेतृत्व प्रशालेला अमोल सरांच्यामुळे प्राप्त झाले एक अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून सरांचा लौकीक आहे उत्तम वक्तृत्व कला सरांनी प्राप्त केलेली आहे विद्यार्थी प्रिय इतिहास अध्यापक म्हणून अमोल सर सर्वांचे प्रिय आहेत . अपार कष्टकरणे गरीबांची कणव असणे मदतीला धाउन जाणे या गुणांमुळे अमोल सर लोकप्रिय झाले आहेत प्रशालेचे कोणतेही काम असो अमोल सर झोकून देवून ते काम पूर्णत्वाला नेत असतात . विद्या मंदिरच्या एनसीसी विभागाला आदर्श ऑफिसर अमोल सरांच्या रूपाने लाभलेले आहेत . प्रथम ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर अमलो सरांचे एनसीसी ऑफिसरचे दुसरे ट्रेनिंग सरांनी नुकतेच नागपूर कामटी येथे पूर्ण केले अतिशय खडतर असे ट्रेनिंग सरांनी शिस्तबद्ध पूर्ण केले . विद्यामंदिर मध्ये परिपूर्ण ट्रेनिंग झालेले एनसीसी ऑफिसर विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे प्रशालेच्या लौकीकात भरच पडलेली आहे . रविवारी पालक स्नेह मेळावा आयोजित केला होता . त्यानिमित्ताने मुलींच्या एनसीसी ऑफिसर सौ शर्मिला केळूसकर मॅडम यांनी आणि प्रशालेतील एनसीसीचे विद्यार्थी यांच्या वत्तीने श्री अमोल सरांचा सत्कार मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव मॅडम श्री अच्युतराव वणवे सर व सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .