*रेशन कार्डधारकांच्या धान्य वाटपास मुदत वाढीसाठी राज्यस्तरावर मागणी*

*रेशन कार्डधारकांच्या धान्य वाटपास मुदत वाढीसाठी राज्यस्तरावर मागणी*

*कोंकण Express*

*रेशन कार्डधारकांच्या धान्य वाटपास मुदत वाढीसाठी राज्यस्तरावर मागणी*

*ऑफलाइन धान्य देण्याचे अधिकार तहसील स्तरावर नाहीत*

*तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची माहिती*

*युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली होती धान्य ऑफलाइन देण्याची मागणी*

गेले काही दिवस सर्वर ला एरर येत असल्यामुळे रेशन कार्ड धारकांना ऑनलाईन धान्य पुरवठा करणे अडचणीचे होत आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ऑफलाईन धान्य वाटप करण्यास परवानगी नाही. ऑफलाईन धान्य वाटप केल्यास केंद्र शासनाकडून मार्जीन च्या रकमेची व इतर खर्चांची प्रतिपूर्ती मिळत नाही. तसेच केंद्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार यापुढे carry forward सुविधेकरिता त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता केंद्र शासनास मंत्रालय स्तरावरून पत्र पाठविण्यात आले आहे. व धान्य वाटपास मुदतवाढ देण्याकरिता पाठपुरावा करण्यात येत आहे. तशी मागणी देखील जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्यामार्फत प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा संगणक यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. युवा सेनेमार्फत जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कार्डधारकांना धान्य ऑफलाईन द्या अन्यथा तहसील कार्यालयाला घेराव घालणार असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार श्री देशपांडे यांनी ही माहिती दिली. या बाबत च्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. ऑफलाईन धान्य वाटप करण्याची परवानगी केंद्र शासनाकडून देण्यात येते. तहसील स्तरावर याचे अधिकार नाहीत. संपूर्ण राज्यभरात हा प्रश्न आहे. त्यामुळे या महिन्यातील धान्य वाटपास मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याची माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!