*कोंकण Express*
*कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कुडाळ तालुका अध्यक्षपदी रवी माने यांची निवड*
*कासार्डे प्रतिनिधि : संजय भोसले*
कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कुडाळ तालुका अध्यक्ष म्हणून रवी माने यांची निवड कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव (दादा) पेणकर, महासंघाचे उपाध्यक्ष जितेंद्र पवार, महासंघाचे सहसचिव सुधीर पराडकर, महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक यांनी केली.
कुडाळ तालुकाध्यक्ष रवी माने यांना नियुक्तीपत्र उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी उपस्थितझू मालवण तालुकाध्यक्ष संदीप सावंत, सावंतवाडी तालुका रिक्षा चालक अशोक सावंत उपस्थित होते. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.