त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या मुलींनी मातां सोबत केले वृक्षारोपण

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या मुलींनी मातां सोबत केले वृक्षारोपण

*कोंकण Express*

*त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या मुलींनी मातां सोबत केले वृक्षारोपण*

शिक्षण सप्ताह निमित्त सहाव्या दिवशी इको क्लब स्थापन करणे, शालेय परिसरात वृक्षारोपण करणे, मोकळ्या जागेत वृक्षारोपण करणे,मातां सोबत घरोघरी वृक्षारोपण करणे,वृक्ष संगोपन बाबत माहिती देणे इत्यादी उपक्रम राबविण्या बाबत सुचना होत्या.त्यानुसार त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.तसेच शाळेबाहेर मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले.वृक्ष संगोपनाबाबत श्री.व्ही डी काणेकर यांनी माहिती दिली.मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे यांच्या अध्यक्षतेखाली इको क्लब स्थापन करण्यात आला.या उपक्रमाचा एक भाग म्हणून शिरवंडे गावातील मुलींना आपल्या मातांसोबत शिरवंडे गावात वृक्षारोपण केले.आजच्या या शिक्षण सप्ताह निमित्त कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे, सहाय्य शिक्षक श्री.सुभाष सावंत, श्री.विष्णु काणेकर, श्रीमती सानिका बाक्रे, श्रीमती शितल धुरी, लिपिक श्री.कैलास घाडीगांवकर, कर्मचारी श्री.गांवकर, श्री.शिंदे, श्री.तांबे यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!