भाजपा वेंगुर्ला व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापक सन्मान सोहळा

भाजपा वेंगुर्ला व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापक सन्मान सोहळा

*कोंकण Express*

*भाजपा वेंगुर्ला व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापक सन्मान सोहळा*

*पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे यांची प्रमुख उपस्थित तालुक्यातील १५३ गुणवंतांचा होणार सत्कार*

*नवनिर्वाचित आमदार अँड . निरंजन डावखरे यांचा तालुक्यातील विविध संस्थांच्या वतीने सत्कार*

कोकण बोर्ड मध्ये सातत्याने सिंधुदुर्ग जिल्हा गेली कित्येक वर्ष दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये अग्रक्रमावर आहे.
भाजपा वेंगुर्ला च्या वतीने प्रतिवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो, तसेच वेंगुर्ला तालुक्यातील ज्या प्रशालाचां दहावी आणि बारावीचा निकाल हा शंभर टक्के लागला त्या प्रशालेतील मुख्याध्यापक आणि पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीधारक आणि पूर्व माध्यमिक शिष्यृवृत्तीधारक यांचाही सन्मान केला जातो
यावर्षी शुक्रवार दिनांक ०२ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० वाजता स्वामिनी मंडपंम्, वेंगुर्ला येथे कोकण पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या सन्मान सोहळ्यात दहावी आणि बारावी परीक्षेत वेंगुर्ला तालुक्यातील सर्व प्रशालेतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी आणि ५ वी आणि ८वी मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि १०० टक्के दहावी आणि बारावी निकाल देणाऱ्या प्रशालेतील मुख्याध्यापक याचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तरी या सन्मान सोहळ्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापक तसेच शिक्षणप्रेमी नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भापजा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!