*कोकण Express*
*मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे नांदगाव येथे निर्माण झालेल्या विविध समस्याबाबत आ. नितेश राणे यांची ठेकेदारशी चर्चा*
*येत्या आठ दिवसांत समस्या सोडवा अन्यथा गाठ माझ्याशी-आ नितेश राणे*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नांदगाव येथे मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे निर्माण झालेल्या विविध समस्याबाबत आम. नितेश राणे यांनी नांदगाव ओटव फाटा येथे उपस्थित राहून ग्रामस्थांसह समस्या जाणून घेत हायवे प्राधिकरण अधिकारी,ठेकेदार कंपनी व यांच्या सोबत चर्चा करत येत्या आठ दिवसांत समस्या सोडवा अन्यथा गाठ माझ्याशी आहे असे सांगत अधिका-यांना खडे बोल सुनावले.असे सांगतानाच स्थानिकांनी काम सुरु असतेवेळी उभे राहून भविष्यात आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन दर्जेदार काम करुन घेण्याची गरज आहे.मी अधिका-यांवर लक्ष ठेवतो तुम्ही कामे दर्जात्मक होतात की नाही यावर लक्ष ठेवा. महामार्ग कितीही चांगला करा मात्र स्थानिकांच्या समस्या सुटल्या नाहीत तर फायदा काय ? कामांचा दर्जा नसेल तर काम बंद पाडू.आपल्या कामाचे कौतुक झाले पाहीजे मात्र कामाबाबत नाराजी येते हे सुधारा. अधिकारी योग्यवेळी बदली साधून निघून जातात यामुळे आम्ही यात लटकतो.हायवेचे काम सुरु असताना अनेक अधिका-यांच्या बदल्या झाल्या.आपण आठ दिवसांत काम करु म्हणता तर आठ दिवसांत आपल्या कोणाची बदली नाही ना ? असा खोचक सवाल अधिका-यांना उपस्थित केला.
आम. राणे यांच्या नांदगाव येथिल पाहणी दौ-या दरम्यान कणकली सभापती मनोज रावराणे, पं.स.सदस्या हर्षदा वाळके,नांदगाव सरपंचा आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर,ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर,हायवे खारेपाटण उपविभाग सहाय्यक उपअभियंता. कुमावत, के.सी.सी. कंपनी व्यवस्थापक,भाजपा नांदगाव शक्तीकेंद्र प्रमुख भाई मोरजकर,माजी सरपंच संजय पाटील,कमलेश पाटील,राजू खोत,प्रमोद पाटील, जाफर कुणकेरकर,रज्जाक बटवाले,विलास कांडर,राजू तांबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी झालेल्या पुढील चर्चेत आम. नितेश राणे म्हणाले, चौपदरीकरण दरम्यान असलेल्या समस्या सोडवणे हा शासन व ठकेदार गयाच्या आपसातल विषय आहे. नागरीकांनी जमिनी दिल्या त्याचा वापर तुम्ही कसा करायचा हा विषय तुमचा असून नागरीकांना कमीत कमी त्रास कसा होईल हे तुम्ही पाहीले पाहीजे आज असे प्रश्न उभेच राहाता कामा नये. महामार्ग तयार झाला मात्र नागरीकांच्या पाण्याचे व सुरक्षेचे प्रश्न उभे राहलेले आहेत.यामुळे कामाच्या दर्जाचा प्रश्न निर्माण होतो. पाण्यासारख्या गंभीर विषय तात्पुरता असू शकतो का आपण काम कधी होणार याचा कार्यकाल ठरवा सध्या ठेकेदार कामे संपवून जाण्याच्या तयारीला लागला आहे. नांदगाव ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला मोर्चा काढून प्रश्न सुटणार नसून हा तांत्रिक प्रश्न आहे. ऐवढा मोठा प्रकल्प होत असताना तांत्रीक बाबी सोडवून घ्याव्या लागतात.मोर्चा काढणा-यांना कितपत हे प्रश्न समजातच हा मोठा प्रश्न आहे.या भानगडीत न पडता आठ दिवसांत काम आपण करुन घेऊ. आपणही उभे राहून कामे करुन घ्या. लोकप्रतिनिधींना बोलवायची गरज भासली नाही पाहीजे आपल्याला समजल्यावर आपणच पोहचले पाहीजे असे उपस्थित लोकप्रनिधींना सांगितले. गावातील प्रश्न सुटत नसतील तर प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात.कितीही चांगला रस्ता बांधा पाणी येत नसेल तर मोर्चे निघणारच असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सरपंचा आफ्रोजा नावलेकर यांनी नांदगावमधील चौपदरीकरण समस्या आपण दिडवर्षे अधिका-यांना सांगतो मात्र ते सोडतव नसल्याची तक्रार आम. नितेश राणेकडे केली.त्याचबरोबर यावेळी श्री. पाटील यांना नांदगाव पाटीलवाडीच्या बसस्टॉपचा प्रश्नही उपस्थित केला यावर आम. राणे ठेकेदार कंपनीच्या अधिका-यांना तातडीने सोडविण्यास सांगितले. यावेळी ओटव फाटा ते नांदगाव तिठठाकडे जाणा-या सर्व्हीस रोडचांही प्रश्न उपस्थित झाल्यावर अधिका-यांचे म्हणने एकून घेतल्यानतंर आम. राणे यांनी आपल्या फाईली एका टेबलावरुन दुस-या टेबलांवर सरकण्यासाठी वेळ लागत असल्याने याचा त्रास होतो. प्रशानाने काम जलदगतीने केल्यास ही कामे राहणारच नाही. यासाठी माझी अथवा खा.नारायण राणे याची मदत घ्या. अधिका-यांनी आमची दर पंधरा दिवसांनी भेट घेऊन कामांसाठी मदत घेतल्यास कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत. यावेळी नांदगाव रिक्षा स्टँड विषयी जाफर कुणकेरकर यांनी प्रश्न उपस्थित करताच तोही सोडविण्याचे आश्वासन दिले. बाजारपेठेचाही प्रश्न सोडविण्यात येईल असेही सांगितले. उत्तम सावंत यानी देवगड निपाणी राज्य मार्गाच्या बंद असलेल्या खडीकरणांचा प्रश्न उपस्थित करीत लक्ष वेधले.यावेळी चौपदरीकरण संदर्भात अनेक समस्यांचा पाढाच नागरीकांकडून सांगण्यात आला.