*कोंकण Express*
_*अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून मणेरी जिल्हा परिषद मतदारसंघात शैक्षणिक साहित्य वाटप ; विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंदोत्सव*_*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ.अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यातील मणेरी जि.प. मतदार संघात सासोली, पाटये पुनर्वसन, मणेरी, सासोली हेदूस-वाघमळा शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ.अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंदोत्सव दिसला.
यावेळी व्यापीठावर दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर यांनी मार्गदर्शन केले व अर्चना फाउंडेशन च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व मुलांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक, पालक, यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक , शाळा व्यवस्थापन पदाधिकारी , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस, महिला तालुकाध्यक्ष सौ.ममता नाईक, युवक अध्यक्ष गौतम महाले, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, मागास वर्ग सेल अध्यक्ष उल्ल्हास नाईक आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.