अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोडामार्ग महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोडामार्ग महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

*कोंकण Express*

_*अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोडामार्ग महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती*_

*_महिला पदाधिका-यांची बैठक उत्साहात संपन्न_*

*दोडामार्ग ः प्रतिनिधी*

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत दोडामार्ग संपर्क कार्यालयात महिला बैठक पार पडली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पञे प्रदान करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर कोकण महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब, प्रदेश उपाध्यक्षा सौ.नम्रता कुबल, जिल्हाध्य सौ.रेवती राणे, तालुकाध्यक्ष सौ.श्रेजल नाईक, उपाध्यक्ष सौ.प्रिया नाईक उपस्थित होत्या. यावेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब, प्रदेश उपाध्यक्षा सौ.नम्रता कुबल, जिल्हाध्य सौ.रेवती राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी महिला दोडामार्ग तालुका कार्यकारिणीत सचिव पदी सौ.रिद्धी राजन मुंगी-कोलझर, तर सदस्य पदी सौ.सुप्रिया राजन बोंद्रे-कोलझर, सौ.तेजस्विता प्रसाद जाधव-दोडामार्ग, सौ.लक्ष्मी लक्ष्मण बोंद्रे -कोलझर, सौ.वंदना अनंत पास्ते -कोलझर, सौ.समिक्षा रामचंद्र बोंद्रे -कोलझर यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस, युवक अध्यक्ष गौतम महाले , शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, मागास वर्ग सेल अध्यक्ष उल्ल्हास नाईक, वैभव परब, विष्णु नार्वेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!