*कोंकण Express*
*तिर्लोट ठाकूरवाडीतील उबाठा शिवसेनेचे शाखाप्रमुख व बूथ प्रमुख यांच्यासह आ.नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये केला प्रवेश*
तिर्लोट ठाकूरवाडी येथील उबाठा शिवसेनेचे शाखाप्रमुख व तेथील बूथ प्रमुख वइद अहमद ठाकूर, यांच्यासह तेथील शिवसेना उबाठा शिवसेना कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळ खडपे, अरीफ बगदादी, माजी जी प सदस्य संजय बोंबडी, तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली यांच्यासह अनेक जण उपस्थित होते
यावेळी वइद ठाकूर यांच्यासह
नेहाल दादन, अफाक इब्राहिम ठाकूर, माहमूद मस्सीद ठाकूर, शाहरुख मजीर अली ठाकूर, इत्यादींनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे
आमदार नितेश राणे हे तालुक्यात विकासाची गंगा आणू शकतात. असा विश्वास प्रवेश करते आणि व्यक्त केला आहे

