*कोंकण Express*
*किसन ठोंबरे यांचे एल.एल.बी. परीक्षेत यश*
कणकवली येथील किसन ठोंबरे यांनी मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणार्या एल.एल.बी. परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शन कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे तत्कालिन वैद्यकिय अधिक्षक डॉ. शिकलगार यांचेकडून मिळाली. नंतरच्या काळात डॉ .धर्माधिकारी व डॉ. पंकज पाटील यांचे वेळोवेळी सहकार्य मिळाले. कणकवलीतील प्रतिथयश वकील अॅड . संदीप वंजारे व अॅड. शंकर राणे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.