कलेवर जिवापाड करणारा ध्येयवेडा चित्रकार प्रसाद राणे

कलेवर जिवापाड करणारा ध्येयवेडा चित्रकार प्रसाद राणे

*कोंकण Express*

*कलेवर जिवापाड करणारा ध्येयवेडा चित्रकार प्रसाद राणे*

कलावंत मानवी जीवनातील सौंदर्य सामान्य विचारातून उलगडून देत असतात हे जग सुंदर करण्यासाठी कलावंत सतत आपले जीवन व्यापून टाकत सामान्य माणसाला जीवनातील सुंदरते पर्यंत घेऊन जातात खरंतर कलावंत देवाचे लाडके असतात देवानेच या सृष्टीचा स्वर्ग बनविण्यासाठी या सृष्टीत पाठविलेले असते म्हणून आदर्श जगाची आणि निर्मळ जीवनाची सर्व स्वत्व शोधण्यासाठी कलावंत असतात . विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेला प्रसाद राणे सरांच्या रुपाने निष्णात कलावंत लाभला म्हणून प्रशालेचा आसमंत राणे सरांच्या कलेची सर्वक्षेत्रात भरारी दिसून येते केवळ व्यवहारी जीवनाचा विचार करणारी माणसं या जगाचा कायापालट करूच शकणार नाहीत केवळ चित्रकार आपल्या कलेच्या आविष्कारातून विविध रंगांची उधळण करत असतात प्रसाद राणे सरांकडे जन्मजात कला वडिलांकडून प्राप्त झाली पण त्या कलेची विकसित रूपे सरांनी साधनेतून अखंड व्रतस्थपणे सिद्ध करून दाखविली सरांनी आपल्या हातांच्या जादूरूपी लेखनितून सिद्धहस्त लेखन करून शाळेचे फलेक देखणे केले अनेक डिजिटल बॅनर सजविले पण कुठेच कलेचा गर्व नाही प्रसाद सरांकडे कंटाळा थकवा कधिच जाणवला नाही नेहमी कलेच्या विश्वात मग्न असलेला कलावंत हा मोठ्या मनाचा असतो प्रशालेच्या विद्यार्थी विश्वात नेहमी तन्मयतेने जीव ओतून कलेचे विश्व भरभरून ओतणारा एक विरळाच कला अध्यापक म्हणून विद्यार्थी प्रिय असणारा ध्येयवेज अध्यापक सरांची कला फक्त शाळेपुरती मर्यादित नाही परिसरातील शाळाशाळांत स्वत: जाऊन चित्रांच्या विविध रेषा पोहचविणारा विरळाच शिक्षक नेहमी कलेत रमलेले सर इतर क्षेत्रात ही तोलामोलाची कामगिरी करून मानवतेची सेवाकरणे या समाजसेवी वृत्तीची जाणीव त्यांच्यात काठोकाठ भरलेली आहे सामान्य ‘ कष्टकरी ‘ गरीब विद्यार्थ्यांची कणव असलेला शिक्षक ते आदर्श कलावंत म्हणून प्रसाद सर शोभून दिसतात . सर्वांशी प्रेमळपणे वागणे , या गुणामुळे राणे सर सर्वांना नेहमी हवेहवे वाटत असतात शिस्तबद्धपणा टापटिप रहाणी वक्तशीरपणा हा गुण सरांच्या व्यक्तीमत्वात भिनलेला असल्याने आदर्श जीवनातील सुंदरता टिपणे सरांना खूप आवडते या वैशिष्ट्यामुळे हे जग सुंदर करून जाईन हा ध्यास घेतलेला श्रेष्ठ कलावंत म्हणजे प्रसाद राणे सर
यशस्वी कलावंत . अशीच कलेची नवनविन क्षेत्रे तुमच्या हातून विकसित होवोत हिच वाढदिवसाची मनापासून शुभेच्छा !!
डॉ . पी जे कांबळे
मुख्याध्यापक
विद्यामंदिर कणकवली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!