*कोंकण Express*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत कौशल्ये डिजिटल मार्गदर्शन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शिक्षण सप्ताहाचा पाचवा दिवस कौशल्ये डिजिटल मार्गदर्शन म्हणून साजरा करण्यात आला . संगणक तज्ञ सौ रश्मी बाईत मॅडम यांनी आधुनिक तंत्रज्ञानाविषयी प्रशालेतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह डिजिटल तंत्राविषयी सविस्तर अचूक माहिती सुगम भाषेत समजून सांगितली अध्ययन अध्यापन व शिक्षणशास्त्रात आधुनिक डिजिटल तंत्राचा वापर कसा करावा या विषयी मार्गदर्शन करून प्रशालेच्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात नेवून सोडले . आजचे शिक्षण हे केवळ पाठयपुस्तका पुरते मर्यादित नसून विश्वव्यापी शिक्षण झालेले आहे करिअरच्या नवनविन वाटा निर्माण झालेल्या आहेत याची संपूर्ण माहिती आदरणीय बाईत मॅडम यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना दिली . या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विज्ञान शिक्षक श्री पृथ्वीराज बर्डे सर व श्री .नेताजी जाधव श्री निशांत काणेकर सौ केळुसकर यांनी केलेले होते मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी आधुनिक शिक्षणात डिजिटल शिक्षणाचे महत्व या विषयी माहिती विषद करून शुभेच्छा दिल्या . केंद्रप्रमुख श्री पवार साहेब यांनी कौशल्य डिजिटल उपक्रमाला भेट देवून मार्गदर्शन केले . पर्यवेक्षिका वृषाली जाधव श्री उच्युतराव वणवे .सर व विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते .