*कोंकण Express*
*कबुलायतदार प्रश्न सुटत नाही तोवर मागे हटू नये…*
*संजू परबः संदीप गावडेंच्या माध्यमातून ग्रामस्थांचं सुरू असलेल्या उपोषणाला संजू परबांनी भेट देत दिला पाठिंबा..*
*ओरोस ः प्रतिनिधी*
जनतेच्या न्याय हक्कासाठी संदीप गावडे आमरण उपोषणाला बसले आहेत. आंबोली, गेळे जमीन प्रश्न अनेक वर्षे ऐकतोय. अनेक नेते आश्वासन देत आहेत पण, काम होत नाही आहे. जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मागे हटू नये. संदीप गावडे यांच्या उपोषणाला निश्चित यश येईल असा विश्वास सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संदीप गावडे यांच्या माध्यमातून गेळे गावच्या कबुलायतदार प्रश्री ग्रामस्थांच उपोषण सुरू आहे. यावेळी संजू परब यांनी भेट देत दिला पाठिंबा.
यावेळी जोपर्यंत गावकऱ्यांना न्याय मिळत नाही त्यांच्या जागांचा वाटप होत नाही तोवर हटणार नाही असा इशारी संदीप गावडे यांनी दिला.