*कोकण Express*
*जिल्ह्यातील कर्करोग रुग्णांचा शोध घेतला जाणार…*
*श्रीमंत चव्हाण; जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून मोहीम…*
*सिंधुदुर्गनगरी ता ०४*
४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत पंधरवडा साजरा करून कर्करोग रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
आज ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन जिल्हा रुग्णालय ओरोस येथे साजरा करण्यात आला. यनिमित्त ४ फेब्रुवारी ते २२फेब्रुवारी या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या पंधरवडा कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्या हस्ते आज दिप प्रज्वलन करून करण्यात आले .
यावेळी डॉ. अविनाश नलावडे , डॉ राहुल जाधव , डॉ. काचन देसाई , अनिल देसाई , केतन कदम , मयुरी सांवत , रमेश पंडीत , राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे विजय सोनारे , कार्मीस अल्मेडा उपस्थित होते .
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय ,उप जिल्हा रुग्णालय , ग्रामीण रुग्णालय ,आणि प्राथमिक आरोग्य केंद्र , उपकेंद्र मार्फत कर्करोग तपासणी ४ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी पर्यंत पंधरवडा साजरा करून होणार असून या संधीचा लाभ जिल्हा वासियानी घ्यावा. असे आवाहन डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी यावेळी केले . व जे रुग्ण संशयित आढळणार आहेत त्यांना कोल्हापूर येथील तज्ञ डॉक्टर मार्फत तपासणी करून उपचार केले जातील. असे सांगण्यात आले . शेवटी आभार कार्मीस अल्मेडा यांनी मानले .