*कोंकण Express*
*संजय पडतेंना बढती, जिल्हाप्रमुखपदी बाबुराव धुरी*
*रूपेश राऊळ सावंतवाडी विधानसभा प्रमुख*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे याबाबत कळविण्यात आले आहे. ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी बाबुराव धुरी (सावंतवाडी विधानसभा आणि कुडाळ तालुका) यांची तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख पदी रुपेश राऊळ (सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुके) यांची निवड करण्यात आली आहे.