*कोंकण Express*
*कोकिसरेची तानिया घाडी अव्वल तर भुईबावडाची गायत्री पाटेकर द्वितीय*
*वैभववाडी तालुका विज्ञान मेळाव्याचा निकाल जाहीर*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
गटशिक्षणाधिकारी कार्यालय वैभववाडी व जिल्हा तसेच वैभववाडी तालुका विज्ञान मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2024 कोकीसरे हायस्कूलमध्ये पार पडला. यामध्ये तालुक्यातील 10 माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात श्री माधवराव पवार विद्यालय कोकीसरेची तानिया घाडी ही प्रथम आली तर आदर्श विद्यामंदिर भुईबावडाची गायत्री पाटेकर ही द्वितीय आली. या दोन्ही विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मंगळवार दि. 23 जुलै 2024 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याच्या निमित्ताने कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती वैभववाडीचे गटशिक्षणाधिकारी श्री. शिनगारे, मुख्याध्यापक. विनोद गोखले, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे सदस्य स्वप्निल पाटील, वैभववाडी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष अविनाश कांबळे,बी आर सी स्टाफ तसेच तालुक्यातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते. सदर मेळाव्याचे परीक्षण संजय पाटील सर व मृणाल गोसावी मॅडम यांनी केले. स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व प्रथम तीन क्रमांकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी विशेष सहकार्यासाठी कोकिसरे हायस्कूलचे प्रयोगशाळा सहाय्यक सुनील वाडेकर यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. सरिता जाधव व आभार तालुकाध्यक्ष अविनाश कांबळे यांनी मांडले.