*कोकण Express*
*लोरे सुतारवाडीत उद्या श्री भवानी देवीच्या त्रैवार्षिक गोंधळाचे आयोजन..*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
लोरे नं. 2 सुतारवाडी येथे शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी रोजी श्री. भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे-शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. श्री भैरीदेवी पूजन, सायं. 5 वा. देवीचा जोगवा, सायं. 7 वा. दीवटी पेटविणे, रात्री 8 वा. ओटी भरणे, रात्री 9 वा. महाप्रसाद, रात्री 12 वा. गोंधळी कथा, शनिवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सायं. 6 वा. संगीत खुर्ची (महिलांसाठी), रात्री 9 वा. मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रविवार दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 वा. आरती, दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, रात्री 9 वा. सत्कार सोहळा, रात्री 10 वा. श्री दत्त माऊली पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ दाभोली वेंगुर्ला यांचे दशावतारी नाटक आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. गजानन हरी सुतार यांच्या निवासस्थानी हा उत्सव होत आहे. तरी या उत्सवाला परिसरातील भाविकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन नवतरुण भजन, नाट्य मंडळ सुतारवाडी यांनी केले आहे.