*कोंकण Express*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या शालेय पोषण आहार योजनेची पहाणी करताना योजना शिक्षणाधिकारी श्री कुडाळकर साहेब*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यामिक प्रशालेत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थांना शासन योजनेनुसार प्रधानमंत्री पोषण आहार मध्यान भोजन नियोजनबद्ध आणि सकस आहार दररोज प्रशालेत दिला जातो सुयोग्य नेटके आयोजन करून दररोज आठशे विद्यार्थी सकस आहाराचा लाभ घेत असतात शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी शालेय पोषण आहाराचे लक्षपूर्वक नियोजन करून प्रशालेतील विद्यार्थी लाभार्थीना पोषण आहारातील सत्वयुक्त आहाराचा पुरवठा करून प्रशालेला मदतीचा हात देत आहेत मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांच्या आदर्श नेतृत्वाखालील प्रशालेतील सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी या योजनेचे मनःपूर्वक काम करून विद्यार्थी हित जोपासण्याचे कर्तव्य पार पाडून उत्तम प्रतिचे मध्यान भोजन देत आहेत . शिक्षण सप्ताहाचा दुसरा दिवस साजरा करत असताना योजना शिक्षणाधिकारी आदरणीय कुडाळकर साहेब व गट शिक्षणाधिकारी श्री गवस साहेब यांनी प्रधानमंत्री शालेय पोषण आहाराची विद्यार्थी आहार घेत असताना पहाणी करून योग्य व नेटक्या नियोजनाचे कौतुक केले आणि समाधान व्यक्त केले प्रशालेच्या नेतृत्वाचे आणि शिक्षकांच्या कर्तव्य भावनेचे उपक्रम शिलेचे कौतुक करून शाब्बासकीची थाप दिली यावेळी पर्यवेक्षिका सौ जाधव मॅडम जेष्ठ शिक्षक श्री अच्युतराव वणवे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते