*कोंकण Express*
*विद्यामंदिर प्रशालेत विद्यार्थ्यांना दिले इव्हीएम मशिनद्वारे मतदानाचे धडे*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत भारतातील लोकशाही पद्धतीचे मतदान प्रक्रिया या विषयीचे प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देण्यात आले . प्रशालेच्या विद्यार्थी स्वराज्य मंत्रीमंडळाची निवडणूक कार्यक्रम सांस्कृतीक मंडळाने आयोजित केला होता शिक्षण सप्ताहाचा दुसरा दिवस मतदान जनजागृती आणि मतदानाची प्रक्रिया कसी असते या विषयाची विद्यार्थ्यांनी अनुभूती घेतली . सांस्कृतीक विभाग प्रमुख श्री सिंगनाथ सर व सौ केळुसकर मॅडम श्री नेताजी जाधव सर सर्व शिक्षक यांनी लोकशाहितील निवडणूक आणि मतदान प्रक्रिया या विषयांचे मार्गदर्शन करून उमेदवार निवड प्रक्रिया अर्जनिवेदन तसेच छाननी प्रत्यक्ष उमेदवार खाते निवडणूक प्रचार यंत्रणा मतदान प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक मतदान क्रियेची ओळख निवडणूक आयोगांची प्रत्यक्ष निवडणूक पार पाडण्याची कर्तव्य यांची संपूर्ण शाळेला माहिती करून दिली या कार्यक्रमाला योजना (शिक्षण ) शिक्षणाधिकारी आदरणीय कुडाळकर साहेब व गटशिक्षणाधिकारी श्री गवस साहेब उपस्थित होते आदरणीय कुडाळकर साहेब यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया समजून घेतली आणि या अनोख्या उपक्रमांचे कौतुक केले . प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी प्रमुख पाहूण्याचे स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश समजून सांगितला . या कार्यक्रमाला श्री सिंगनाथ सर श्री वणवे सर पर्यवेक्षिका सौ जाधव मॅडम श्री शेळके जे जे सर व प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते .