*कोंकण Express*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत नवभार साक्षरता कार्यक्रमांचा जागर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शिक्षण सप्ताह निमित्त नवभारत साक्षरता प्रसाराचा कार्यक्रम आयोजित केला होता या साक्षरता प्रसार कार्यक्रमाला प्रत्यक्ष असाक्षर पालक तसेच असाक्षर लाभार्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते ‘ . प्रशालेतील अमराठी भाषिक पन्नास विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते . भारत देशाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रत्येक नागरिक मूलभूत ज्ञानाने साक्षर झाला पाहिजे या हेतूने मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी या कार्यक्रमाचे आयोजन घडवून आणले होते प्रत्यक्ष अनुभूतीने निरक्षर व्यक्तीना अक्षरांची व संख्या ज्ञानाची ओळख कृतीतून व चित्रातून करून देण्यात आली . तसेच लोकसंगीताची जोड देवून मनोरंजक पद्धतीने साक्षर गिते मधूर आवाजात प्रशालेतील संगीत विभागाने उत्तम रितीने गायनाचा बहारदार कार्यक्रम सादर करून असाक्षर व्यक्तींचा शिक्षणांचे महत्व पटवून दिले . या सुंदर कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे योजना शिक्षणाधिकारी आदरणीय कुडाळकर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच गटशिक्षणाधिकारी गवस साहेब उपस्थित होते आदरणीय कुडाळकर साहेब मार्गदर्शन करतांना असाक्षर व्यक्तींनी साक्षर होण्याची मुलभूत संकल्पना आपल्या रसाळ वक्तव्यातून मांडली तसेच अमराठी भाषिक विद्यार्थ्यांना मराठी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले यावेळी सर्व असाक्षर व्यक्तींचे स्वागत कुडाळकर साहेब यांनी केले या कार्यक्रमाचे निवेदन जेष्ठ शिक्षक श्री अच्युतराव वणवे सरांनी केले प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी केले यावेळी विद्यार्थी व पालक बहूसंख्येने उपस्थित होते .