*कोंकण Express*
*मंत्री दिपक केसरकर यांना आमनेसामने होवून जाऊद्या माजी आमदार राजन तेली यांचे आवाहन*
गेली १५ वर्ष आमदार, आठ वर्षे मंत्री असूनही केसरकर विकासाच्या बाबतीत झीरो-माजी आमदार राजन तेली
सावंतवाडी दि.२२ जुलै
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांना आमनेसामने होवून जाऊद्या असे आवाहन भाजपचे माजी आमदार
राजन तेली यांनी दिले आहे. ते म्हणाले, गेली १५ वर्ष आमदार, आठ वर्षे मंत्री असूनही विकासाच्या बाबतीत झीरो ठरल्याने त्यांनी प्रसंगी प्रॉपर्टी विकून विकास करण्याचे भाषा केली आहे. घोषणा केलेली कामे प्राधान्याने करण्याचे आवाहन केले आहे. राजन तेली म्हणाले, भोळ्याभाबड्या जनतेची केसरकर अजून किती दिशाभूल करणार आहे. त्यांच्या घोषणा, शिक्षणमंत्री म्हणून घोळ घातला आहे त्याचा पर्दाफाश करून उघडे पाडणार आहे. केसरकर यांनी हिम्मत असेल तर चर्चासत्राच्या माध्यमातून आमने सामने यावे व पंधरा वर्षात जिल्ह्याचे किंबहूना मतदारसंघाचं काय भलं केलं हे लोकांसमोर मांडावे, मीही पर्दाफाश करण्यास तयार आहे असे त्यांनी सांगितले.
तर मंत्री केसरकर यांच्याच शिक्षण खात्यामध्ये टेंडर न काढताच तब्बल ८० कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट वाटण्यात आले असून पुजा खेडेकर प्रकरणातही केसरकर यांचे नाव चर्चेत आहे असे वृत्त खाजगी वाहिन्यावर प्रसारित झाले आहे ते लाव रे ती न्युज धर्तीवर त्यांनी मांडला. आता नैतिकता पाळून एकतर राजीनामा द्यावा नाहीतर याबाबतचा योग्य खुलासा करावा अशी मागणीही तेली यांनी केली.
श्री तेली यांनी आज आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते ते म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर नवनवीन घोषणा केसरकर करत आहेत परंतु त्यांनी पंधरा वर्षांमध्ये केवळ येथील जनतेला फसवण्याचे काम केले आहेत आज पंचतारांकित हॉटेलच्या घोषणा केसरकर करत आहेत परंतु स्वतःच्या घरासमोरील एसटी बस स्टॅन्ड साडेसात वर्ष होऊनही ते सुधारू शकले नाहीत, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भूमिपूजन होवून एक विटही रचू शकले नाही, ही शोकांतिका आहे. ते म्हणाले, रेडी येथे सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत ते बोलत आहेत तसेच पंचतारांकित ताज हॉटेलही भूमिपूजन दोन महिन्यात होणार असल्याचे ते म्हणत आहेत या ठिकाणी उद्योग व्यवसाय यायलाच पाहिजे त्याबाबत आमचा विरोध नाही परंतु उद्योग येताना स्थानिकांना तिकडून विस्थापित करू नये ही आमची भूमिका आहे त्यामुळे उद्या तुम्ही कुठल्याही नेत्यांना बोलवा परंतु त्या नेत्यांनी आधी जनतेचे प्रश्न ऐकून घ्यावे अशी माझी विनंती असणार आहे रेडी येथे कुठल्याही प्रकारची जमीन नसताना घोषणा ते करत आहे केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे गोड बोलून इथल्या जनतेची आणि तरुण पिढीची फसवणूक करण्याची संधी मी केसरकर यांना देणार नाही पक्ष मला तिकीट देईल की नाही ही दूरची गोष्ट आहे परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये गावागावात जाऊन केसरकर यांच्या आश्वासनांचा त्यांनी केलेल्या घोषणांचा बुरखा मी फिडणार आहे. तेली पुढे म्हणाले, मंत्री केसरकर प्रॉपर्टी विकण्याची भाषा पुन्हा एकदा करू लागले आहेत परंतु गेल्या पंधरा वर्षात आमदारकी मंत्रीपद भोगूनही ज्यांना काही करता आले नाही ते आता पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी सज्जनतेची भाषा करत आहेत परंतु विकास बाजूला ठेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक तरी असा विकास सांगा की जो तुम्ही केलात आणि त्यातून तुम्ही इथल्या पाच-दहा तरुणांना रोजगार देऊ शकला. त्यामुळे हिम्मत असेल तर चर्चासत्राच्या माध्यमातून आमने सामने यावे व पंधरा वर्षात जिल्हयाचे किंबहूना मतदारसंघाचं काय भलं केलं हे लोकांसमोर तुम्ही मांडा. सज्जन आणि सावंतवाडीच्या संस्कृतीची भाषा ही केसरकर यांनी करू नये मुळात केसरकर तुम्ही सावंतवाडीचे राहीलातच नाही तुम्ही मुंबईकर चाकरमानी झाले आहात त्यामुळे संस्कृतीची भाषा काय होती आणि काय झाली ही सुद्धा निवडणुकीच्या काळात आपण जनतेसमोर आणणार आहे तर युती संदर्भात सांगायला केसरकर हे माझे नेते नाहीत जे काय सांगायचे असेल ते माझे वरिष्ठ मला सांगतील शिवाय कोणालाही उमेदवारी द्या परंतु केसरकर यांना उमेदवारी नको अशी ही मारीच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी राहणार आहे.