*कोंकण Express*
*संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे वितरण यापुढे डी.बी. टी. पद्धतीने होणार – तहसिलदार दीक्षांत देशपांडे*
*लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे २५ जुलै पर्यंत सादर करावेत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थ सहाय्याचे वितरण लाभार्थ्यांना यापुढे डी. बी. टी. पद्धतीने होणार आहे. सदर योजनेचे लाभ थेट लाभ हस्तातरण प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक लाभार्थ्यांची माहिती डी. बी. टी. पोर्टल वर भरण्याचे काम तहसीलदार कार्यालय कणकवली येथे सुरू असल्याचे कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी सांगितले.