*कोंकण Express*
*माणगाव जोळकवाडी येथील नाईक कुटुंबियांना आ. वैभव नाईक यांचा मदतीचा हात*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
माणगाव जोळकवाडी येथील सुनील नारायण नाईक यांच्या घरावर नारळा चे झाड पडून नुकसान झाले होते.त्यांना आमदार वैभवजी नाईक यांच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,माणगाव उपसरपंच बापू बागवे शिवसेना माणगाव उपविभागप्रमुख एकनाथ धुरी,चंद्रकांत म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.