*कोंकण Express*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शैक्षणिक कृतितून मराठी व्याकरणाचे पाठ*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शिक्षण सप्ताहाचा पहिलाच दिवस विविध शैक्षणिक उपक्रमाने साजरा करण्यात आला इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी मराठी व्याकरण व शब्दांच्या जाती या संदर्भात शैक्षणिक तक्ते तयार करण्यात आले या सर्व तक्त्यांचा उपयोग विद्यार्थ्यांना कृती देवून शब्द आणि शब्दांचे व्याकरणिक महत्व अनेक उदाहरणे देवून सहजतेतून काठीण्य पातळी अध्यापनातून सोपे करून मराठी व्याकरण विद्यार्थांना अध्यापन कौशल्यातून समजून देण्याची कला सौ विद्या शिरसाठ मॅडम यांनी शिक्षण सप्ताहाच्या निमित्ता प्रशालेत कृतीतून सिद्ध करून दाखविले आहे . प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या नविन शैक्षणिक धोरण यांची उद्दिष्टे गाठण्याचा एक उलेखनिय प्रयोग विद्यामंदिर प्रशालेने प्रभावी राबविण्याचा प्रयत्न यशस्वी केला असेच म्हणावे लागेल . या उपक्रमाला प्रशालेतील सर्व अध्यापकांनी उस्फूर्त सहभाग दर्शविला आहे .