*कोंकण Express*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत इंग्लिश भाषेतील वाचन कट्टा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत इंग्लिश विषयाचे विविध उपक्रम प्रभावी पद्धतीने राबविण्यात येतात इंग्लिश विषयाचे अध्यापक सौ साटम मॅडम सौ हरमलकर मॅडम श्री ठाकूर सर सौ तायशेट्ये मॅडम यांनी शिक्षण सप्ताह निमित्ताने इंग्लिश विषयाची वाचनाची अभिरूची विकसित करण्यासाठी इंग्लिश विषयांची विविध पुस्तके शालेय ग्रंथालयातून उपलब्ध करून प्रशालेत वाचन कट्टा आकर्षक स्वरूपात तयार करून इंग्रजी भाषेची पुस्तके विद्यार्थी वर्गासाठी उपलब्ध करून वाचनाचे महत्व विषद केले प्रशालेतील विद्यार्थी पाचवी ते दहावी शिक्षण सप्ताहानिमित्त ग्रथांच्या सहवासात रममान झाले होते . मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी शिक्षण सहाप्ताच्या प्रशालेतील उपक्रमांचे कौतुक केले व इंग्लिश विषय शिक्षकांचे आभार मानले . या कार्यक्रमाला पर्यवेक्षिका सौ जाधव मॅडम जेष्ठ अध्यापक श्री अच्युतराव वणवे सर व सर्व शिक्षक /ग्रंथपाल श्री पवार सर व विद्यार्थी उपस्थित होते .

