*कोंकण Express*
*वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्टा येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा*
कैलासवासी डॉ. काकासाहेब वराडकर यांचे कार्य अतुलनीय असून गुरुतुल्य डॉ. काकासाहेब यांनी आखून दिलेल्या मार्गावरून आपण सर्वांनी जायचे आहे व पर्यायाने या समाजाचे आपण ऋणी व्हावे यासाठी आपण प्रयत्न करूया असे उद्गार प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी धनंजय गावडे यांनी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा या ठिकाणी साजरा करण्यात आलेल्या गुरु पूर्णिमा कार्यक्रमानिमित्त काढले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. काकासाहेब वराडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरू करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर वराडकर इंग्लिश मिडीयम चे मुख्याध्यापक श्री एच आर नाईक, ज्येष्ठ शिक्षक श्री महेश भाट, बी एम वाजंत्री, कानूरकर पी व्ही, श्री चांदरकर एस ए, श्री राऊळ इ एस, श्री मासी एन एम, श्रीमती भुजबळ , श्रीमती पावसकर ,जेष्ठ शिक्षिका जे एन मालवदे, सौ चांदरकर एस एस, सौ शिरोडकर, सौ कानूरकर सी पी, सौ दळवी, कुमारी परब, संसद सहायक उपाधीपती श्री हडलगेकर ,श्री भूषण गावडे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त मराठी विभागातर्फे मराठी भावगीते व भक्ती गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला तर या कार्यक्रमाप्रसंगी सिद्धी गुराम अन्यन्या पाटील वेदांत म्हाडगुत वेदांत पाटकर कृतिका लोहार ध्रुवी भाट दिव्या कोत्रे द्वितीज गवाणकर भाग्यश्री चव्हाण सिद्धी जांभवडेकर जानवी माळी यांनी गुरू माहात्म्य यावर भाषणे केली. या वेळी प्रशाळेचे कला शिक्षक यांनी गुरू वंदना देण्यासाठी आपली स्व रचित कविता सादर केली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख श्री पेंडुरकर संजय चंद्रकांत यांनी केले .