*कोंकण Express*
*शासकीय ठेकेदार मुदस्सर शिरगावकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा…*
*शिरगावकर यांच्या संकल्पनेतून सामाजिक संस्था एम्पायर फाउंडेशनची निर्मिती ; वाढदिवसाचे औचित्य…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली येथील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मा. मुदस्सर शिरगांवकर यांच्या संकल्पने तुन निर्माण झालेले एम्पायर फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे उदघाट्न शिरगावकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले. आणि एम्पायर फाऊंडेशन सामाजीक संस्था कणकवली यांच्यावतीने मुदस्सर शिरगावकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध मामाजीक उपक्रम राबवण्यात आले.
पंदूर येथील अणावं येथे सविता आश्रम या ठिकाणी धान्य वाटप करण्यात आले. तसेच असलदे येथील दिवीजा वृद्धाआश्रमात एक महिन्याचे धान्य देण्यात आले. त्याचबरोबर आ आंब्रट बाजार येथील प्राथमिक शाळा त्यांच्या मागणीनुसार प्रिंटर कम झेरॉक्स मशीन भेट करण्यात आली. असे बरेच काही उपक्रम वाढदिवसाच्या औचित्य साधून करण्यात आले.