*कोंकण Express*
*विद्यार्थ्यानी अभ्यास करताना सोशल मीडिया पासून दूर रहावे – राजकुमार मुंडे*
*आशिये ग्रामपंचायतच्या वतीने गुणवंतांचा सत्कार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय नोकरी भरतीत मुलांचा दुर्लक्ष आहे.आताच्या पोलीस भरतीत नगण्य तरुणांचा सहभाग आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात चांगले घडण्यासाठी मोबाईलचा चांगला उपयोग केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी दहावी बारावी सह अन्य परीक्षांमध्ये मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. या यशाचे सातत्य विद्यार्थ्यांनी कायम राखले पाहिजे.भविष्यात तुम्ही चांगले आधिकारी बनण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे.विद्यार्थ्यानी अभ्यास करताना सोशल मीडिया पासून दूर रहावे,असे आवाहन कणकवली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे यांनी केले.
आशिये ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने दहावी, बारावी, पदवीधर, डिप्लोमाधारक तसेच तत्सम शैक्षणिक अर्हता प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी युरेका सायन्स क्लब संचालिका सुषमा केणी,सरपंच महेश गुरव,उपसरपंच संदीप जाधव,मालवणी कवी विलास खानोलकर,ग्रामपंचायत सदस्य मानसी बाणे,विशाखा गुरव,संजना ठाकूर,ग्रामसेवक राकेश गोळवणकर,पोलीस भूषण सुतार,माजी सरपंच शंकर गुरव,माजी उपसरपंच प्रवीण ठाकूर,शिक्षक निलेश ठाकूर,सुनील बाणे,सुहास खानोलकर,रविंद्र बाणे,दिवाकर बाणे,संजय बाणे आदींसह पालक,ग्रामस्थ उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना काजूचा वृक्ष भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
युरेका सायन्स क्लब संचालिका सुषमा केणी,तुमच्या गावाने केलेला सत्कार हा सुवर्ण अक्षराने लिहण्यासाठी हा दिवस आहे.आजचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्कार होत आहे.आता शिक्षणात मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे.त्यामुळे मुलांमध्ये अधिकची जाणीव निर्माण आपल्या सिंधुदुर्गातील अनेक मुलांनी मोबाईल मुळे प्रगती केली आहे.प्रत्येक गोष्टीत मुलांना बोलत केलं पाहिजे.५ हजार मुले युरेका सायन्सला जोडली गेली आहेत. भविष्यात किती यश मिळवला तरी मुलांनी गावाला केव्हाही विसरु नका.ज्या विषयात आवड आहे त्या ठिकाणी प्रवेश घेवून घ्या,यश निश्चित मिळेल.तुम्हाला ज्या ठिकाणी समाधान मिळेल,तिथे काम करा.करीयर निवडत असताना घाई करु नका.बऱ्याच स्कॉलरशिप आहेत,शिक्षणासाठी पैशाची गरज नाही.वाचन संस्कृती लोभ पावत चालली आहे.पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन केलं पाहिजे.पुस्तकी ज्ञानापेक्षा बाहेरच्या जगात काय चाललं आहे,त्याचा अभ्यास मुलांनी करावा.
मालवणी कवी विलास खानोलकर म्हणाले, आशिये ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने गुणवंतांच्या सत्काराचा कार्यक्रम हा आनंदाचा क्षण अनुभवता येतो.चांगली मुले घडवीत,त्यासाठी हा गावात एक केलेला प्रयत्न आहे.तुमच्या सन्मान झाला तो तुमच्या शाळेचा आणि पालकांचा आहे.नवनवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यानी शिकलं पाहिजे.मोबाईल फोन मुळे दुनिया मुठीत आहे. मात्र,त्याचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे.
प्रास्ताविक करताना शिक्षक निलेश ठाकूर म्हणाले,आमचे सरपंच महेश गुरव यांच्या संकल्पनेतून गेली चार वर्षे गुणवंतांचा सत्कार हा कार्यक्रम होत आहे.आजचे हे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे.जगामध्ये शिक्षणाच्या प्रवाहात उन्नत जबाबदारी घेण्यासाठी आता ही तरुण मुले सज्ज झाली आहेत.आशिये गावात दहावी ९८ टक्के व बारावीत ८६ टक्के गुण मिळवलेली मुले आहेत,त्याचा आम्हाला अभिमान आहे.
सरपंच महेश गुरव म्हणाले, या गुणवंतांच्या सत्कारामागे आशिये ग्रामपंचायत उद्देश एकच आहे, गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी आपला गाव उभा आहे याची जाण असावी.आपल्या जीवनात एक प्रेरणा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
विद्यार्थिनी पूजा अडसूळ म्हणाली, दहावी आणि बारावी या शैक्षणिक वर्षात काळात खूप काही शिकता आले,हा मुलांचा सत्कार जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम घेतल्यास निश्चित असते. या यशाचे श्रेय माझ्या शिक्षक,आई-वडिलांना आहे.
विद्यार्थिनी आदिती खानोलकर म्हणाली,दहावी वर्षे असल्याने दडपण होतेच,मात्र चांगला अभ्यास केला.माझ्या यशात शिक्षक आणि पालकांचा वाटा आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश लाड यांनी केले.