*कोंकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशन मार्फत दि.२७ व २८ जुलै रोजी जिल्हास्तरिय योगासन स्पर्धेचे आयोजन*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले.*
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा शनिवार दिनांक २७ जुलै व २८ जुलै २०२४ या दोन दिवशीय कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा एकूण चार प्रकारात खेळवली जाणार असून प्रत्येक वयोगटाुसार मुले व मुली यात सहभागी होऊ शकतात. या स्पर्धा ओरोस येथील जिजामाता हॉस्पिटलच्या भव्य हॉलमध्ये घेण्यात येणार आहेत. सदर स्पर्धेसाठी ऑनलाईन फॉर्म भरावयाचे असून याची लिंक https://forms.gle/gxe3QM4ucaf3njpp6 अशी आहे. या लिंक वर गेल्यास संपूर्ण माहिती प्राप्त होऊ शकते, तसेच प्रत्येक इव्हेंटला दोनशे रुपये फी असून आपण किती इव्हेंटमध्ये सहभाग दर्शवणार त्या पटीत ती वाढत जाते. फी भरण्यासाठीचे बँक अकाउंट नंबर सुद्धा गुगल फॉर्म मध्येच दिला आहे.
तसेच या योगासन स्पर्धा ट्रॅडिशनल, आर्टिस्टिक सिंगल, आर्टिस्टिक पेयर, रीदमिक पेयर, अशा प्रकारात होणार असून सब ज्युनिअर ग्रुप वयोगट १०+ ते १४( मुले व मुली), ज्युनियर ग्रुप वयोगट १४+ ते १८( मुले व मुली), सीनियर ग्रुप वयोगट १८+ ते २८( मुले व मुली) ,सीनियर A गट- वयोमान २८+ ते ३५( स्त्री व पुरुष ) ,सीनियर B गट- वयोमान ३५+ ते ४५( स्त्री व पुरुष ),आणि सीनियर C गट- वयोमान ४५+ ते ५५( स्त्री व पुरुष ).अशा प्रकारे होणार असून स्पर्धेच्या वेळी पुढील कागदपत्रे सोबत आणणे अत्यावश्यक आहे .१)आधार कार्डची झेरॉक्स २)बोनाफाईड सर्टिफिकेट (शालेय विद्यार्थ्यांसाठी) वयाचा पुरावा म्हणून.३) वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र. (एम बी बी एस किंवा बी ए एम एस डॉक्टरांचे). ४)रिस्क सर्टिफिकेट ५)पासपोर्ट साईज तीन फोटो.
सलग दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना आयोजकांमार्फत चहा पाण्याची व्यवस्था केली जाईल. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त योगासन स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा योगासन आसोसिएशन मार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संघटनेचे सचिव डॉक्टर तुळशीराम रावराणे मोबाईल नंबर ७०८३६०२५०४, सहसचिव संजय भोसले मोबाईल नंबर ९४२०१५५१३४ स्पर्धा कोऑर्डिनेटर प्रकाश कोचरेकर मोबाईल नंबर ९४२३८७९१३३ आणि सौ. श्वेता गावडे (पळसुले) मोबाईल नंबर ९३०७०६६१५७ या क्रमांकाची संपर्क साधावा . असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग दर्शवून स्पर्धा यशस्वी करवी.