*कोंकण Express*
*तळेरे माजी सरपंच विनय पावसकर यांचे निधन*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
तळेरे गावचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते विनय केशव पावसकर यांचे अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे रविवारी सकाळी 11 वा. उपचारा दरम्यान निधन झाले. ते 55 वर्षांचे होते. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा सातत्याने वावर होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.
विनय पावसकर हे कणकवली येथे टॅक्स कंसल्टटंट चे काम करत होते. अत्यंत मन मिळावू आणि अनेकांशी मैत्रीचे नाते असणाऱ्या पावसकर यांच्या निधनाची बातमी समजताच तळेरे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात आली. तर तळेरे येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे गेली 25 वर्षे सचिव म्हणून काम पाहिले. यादरम्यान अनेक सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. तर गेली तीन वर्षे स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. तळेरे येथील आदर्श व्यापारी संघटनेचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच तळेरे आदर्श व्यापारी संघटनेने बाजारपेठ बंद ठेऊन श्रध्दांजली वाहण्यात आली.
तळेरे पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी स्वखर्चाने तीर्थयात्रा घडवली होती. पावसकर यांच्यावर सोमवारी सकाळी तळेरे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, आई, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे.