*कोंकण Express*
*त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबईचा अभिनव उपक्रम.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत छत्र्या वाटप*
त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई (शिरवंडे, असगणी,किर्लोस)ही संस्था गेली ३१वर्षे त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता.मालवण ही शाळा चालवित आहे.अत्यंत कठीण परिस्थितीत संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम केलेले आहे.शिक्षणा बरोबर विविध उपक्रम शाळेच्या माध्यमातून संस्था राबवित आहे.संस्था संचलित प्रशालेतील सर्वच विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील असून शैक्षणिक साहित्य खरेदी करणे काही पालकांना शक्य होत नाही.याच साठी संस्थेने उपाध्यक्ष श्री.अच्युत भावे यांच्या संकल्पनेतून विचार करून कै.जगन्नाथ सोनू गांवकर यांच्या ठेवीच्या व्याजातून
त्यांच्या पत्नी कै.सुलोचना जगन्नाथ गांवकर यांच्या स्मरणार्थ इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना व संस्था अध्यक्ष श्री.बाबू बाणे व सहसचिव श्री.अशोक भावे यांच्या आर्थिक सहाय्यातून इयत्ता दहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना मोफत छत्र्या वाटप करण्यात आले.छत्र्यावाटप शालेय समिती अध्यक्ष श्री.सहदेव चव्हाण, संस्था सहसचिव श्री.विजय घाडीगांवकर, सहखजिनदार श्री.पंढरीनाथ भावे, शालेय समिती सदस्य श्री.चंद्रकांत गांवकर, श्री.दशरथ घाडीगांवकर, कैलास घाडीगांवकर, मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले.