दोडामार्ग मनसेचे नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

दोडामार्ग मनसेचे नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

*कोकण Express*

*दोडामार्ग मनसेचे नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश*

*राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात पाडला मनसेला खिंडार*

*दोडामार्ग ः प्रतिनिधी*

कसई-दोडामार्ग नगरपंचायत मनसेचे नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस दोडामार्ग कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हाध्यक्ष अमित सामंत व नेते सुरेश दळवी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर योग्य टायमिंग साधत हाती घड्याळ बांधले आहे. यावेळी दोडामार्ग शहरातील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र खडपकर यांनी देखील आपल्या नेतृत्वाखाली तेजस्विनी जाधव, मेघा जाधव, प्रगती कांबळे, संगिता वगैर, अलका जाधव, रामेश्वरी जाधव, अर्जुन जाधव, दत्ताराम जाधव, प्रसाद जाधव, दत्ताराम विष्णू जाधव, भगवान जाधव, नारायण जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत शहरात मनसेचा खिंडार पाडला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सुरेश दळवी, जि.नियोजन सदस्य बाळा कन्हैयाळकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदिप चांदेलकर, दिपक जाधव, संदिप गवस, संदेश वरक, बाबा खतिफ, कृष्णा नाईक, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, श्री.अणावकर, श्री.राजगुरू, श्री.फर्नांडिस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!