*कोंकण Express*
*_किरण उर्फ भय्या शेठ सामंत यांच्या हस्ते लांजा येथील भाकर ग्रामीण वाचनालय इमारत उभारणी कामाचे भूमिपूजन_*
लांजा कोंड्ये येथील भाकर सेवा संस्था येथे सिंधुरत्न समृद्ध योजनेचे संचालक, शिवसेना पक्षाचे नेते *मा.श्री. किरण उर्फ भय्या शेठ सामंत* यांच्या हस्ते भाकर ग्रामीण वाचनालयाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
भाकर सेवा संस्था ही गेली 32 वर्ष रत्नागिरी जिल्हामध्ये सामाजिक कार्य करीत आहे. यामध्ये विशेषतः शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, पर्यावरण, महिला सबलीकरण अशा सामाजिक विषयांवर समाजात जनजागृती तसेच विविध प्रकल्पांच्या साहाय्याने समाजाला नवीन दिशा देण्याचे कार्य करीत आहे. अशा या भाकर सेवा संस्था कोंड्ये, लांजा येथे स्पेन देशातून आलेले पाहुणे सेथेम टीम यांच्या सहकार्याने भाकर ग्रामीण वाचनालयाचे भूमिपूजन *मा.श्री. किरण उर्फ भय्या शेठ सामंत* यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच किरण सामंत यांनी संस्थेच्या विविध प्रकल्पांची पाहणी केली आणि संस्थेच्या प्रकल्पांना शुभेच्छा देऊन वेळोवेळी जेव्हा संस्थेला गरज असेल त्यावेळी मदत करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी लांजा नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष सुनील उर्फ राजू कुरूप, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत, कोंड्ये गावचे सरपंच मनोज चंदुरकर तसेच स्पेन नागरिक आयदा, जोर्डी, मेरिया, माल्टीन, रजिनी, भाकर सेवा संस्था संस्थापक देवेंद्र पाटील, संस्था सचिव श्रीमती अश्विनी मोरे, संचालक पवनकुमार मोरे आणि संस्था कार्यकर्ते, कोंड्ये गावचे ग्रामस्थ आदी उपस्थित होते.