*कोकण Express*
*दिलीप बिल्डकॉन चा हलगर्जीपणा वाहनचालकांना भोवला*
*जेसीबीचे ऑइल रस्त्यावर सांडल्याने झाले अपघात*
*सर्व्हिस रोडवर दुचाकी घसरल्या*
*कणकवली ः प्रतिनिधी*
हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉन च्या जेसीबीचे ऑइल रस्त्यावर सांडल्याने ४ मोटरसायकल घसरून अपघात घडला. संतप्त मोटरसायकल चालकांनी दिलीप बिल्डकॉन च्या क्रेन ची चावीच क्रेन चालकाकडून काढून घेत मॅनेजर ला घटनास्थळी बोलवेपर्यंत चाविच न देण्याचा पवित्रा घेतला.
डीपी रोडसमोरील सर्व्हिस रोडवर हायवे ठेकदाराच्या चालत्या जेसीबीचे ऑइल सांडले होते. या ऑईलवरून ४ मोटरसायकल घसरल्या. वाहनांचे किरकोळ नुकसान झाले तर चालकानाही किरकोळ जखम झाली. संतप्त झालेल्या मोटरसायकल चालकांनी ठेकेदारच्या क्रेन चालकाकडून क्रेन ची चावी काढून घेत नुकसानभरपाई ची मागणी केली.