*कोकण Express*
*पायी हळूहळू चाला मुखाने भालचंद्र बोला… !*
*भालचंद्र महाराजजन्मोत्सवानिमित्त सवाद्य पालखी मिरवणूक ; मंदिरपरिसरात भक्तिमयवातावरण … !*
*कणकवली ः प्रतिनिधी*
पायी हळूहळू चाला मुखाने भालचंद्र बोला…! अशा नाम घोषात आज सायंकाळी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ११७ व्या जन्मोत्सवानिमित्त मंदिर परिसरात पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.कोरोना बाबतचे शासकीय नियम पाळत भाविक भक्तांच्या उपस्थितीत सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.या निमित्ताने मंदिरपरिसरात भक्तिमय वातावरण होते.
असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवाचा प्रमुख दिवस होता.समाधी स्थळी आकर्षक ‘नयनमनोहर’ अशी सजावट करण्यात आली होती.पहाटेची समाधी पूजा सकाळी जपानुष्ठान,सकाळी समाधीस्थानी लघुरूद्राभिषेक तसेच भालचंद्र महाराज जन्मोत्सव किर्तन,जन्मसोहळा पार पडला.यानिमित्ताने गेले चार दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले.
या पालखी सोहळयात सिंधुगर्जना ढोल पथकाने आपल्या कलेचा नमुना सादर करत खऱ्या अर्थाने ढोल ताशांच्या जयघोषत वातावरण भक्तिमय केले होते.त्या जोडीला भालचंद्र महारांजाच्या नामजपाचा गजर पायी हळूहळू चाला मुखाने भालचंद्र बोला.. ! या अभंगाने बाबांचा जयघोष सुरु होता.कोरोनाचे सावट असले तरी या जन्मोत्सव सोहळ्यास जिल्ह्यातील बाबांचेअसंख्य भक्तगण या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते.शहरात काही मंडळांनी तसेच विविध ठिकाणी देखावे व विद्युत रोषणाईसहित बाबांची गाणी लावून हा जन्मोत्सव साजरा केला.रात्रीच्या नित्यआरतीने या जन्मोत्सवाची सांगता होणार आहे.