*कोंकण Express*
*मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभेत विविध उपक्रम…*
*राजन पोकळेंची माहिती; रुग्णवाहिका वाटपासह भजन आणि समुह नृत्य स्पर्धेचे आयोजन…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शालेश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दीपक केसरकर मित्रमंडळाच्या माध्यमातून सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात रक्तदान शिबीर, रुग्णवाहिका वाटप, भजन, गायन, समुह नृत्य स्पर्धा आदी कार्यक्रमाचा समावेश आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी उपनगराध्यक्ष तथा शिंदे गटाचे नेते राजन पोकळे यांनी दिली.
श्री. केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलैला होणार असून ते या दिवशी सपत्नीक सावंतवाडी मतदार संघात उपस्थित राहणार आहेत. त्याच्या प्रमुख उपस्थितीत भजन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पोकळे बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, या ठिकाणी केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भजन स्पर्धा, समुह नृत्य स्पर्धा, भजन स्पर्धेचे उद्घाटन केसरकर यांच्या वाढदिवसादिवशी होणार आहे. तर अंतीम फेरी विठ्ठल मंदीरात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम ३३ हजार ३३३, व्दितीय २२ हजार २२२ आणि तृतीय ११ हजार १११ अशी तर उत्तेजनार्थ आणि गायक- वादक यांना ५ हजार ५५५ रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहे.
समुह नृत्य स्पर्धा शालेय दोन गटात घेण्यात येणार आहे. यात पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी अशी ही स्पर्धा होणार आहे. यात ५ हजार ५, ४ हजार ४, ३ हजार ३ आणि उत्तेजनार्थ १ हजार १ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे.
रक्तदान शिबीर, सावंतवाडी येथील अभिनव फाऊंडेशन तसेच वेंगुर्लेतील वेताळ फाऊंडेशन यांना रुग्णवाहिका वाटप करण्यात येणार आहे तर आंबोली-चौकुळ येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. त्याच बरोबर नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष राणे म्हणाले, सावंतवाडी तालुका पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात रक्तदान शिबीर, गृहपयोगी वस्तूंचे वाटप, खत वाटप आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.