*कोंकण Express*
*वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त )कट्टा येथे नौसेना जनजागृती कार्यक्रम उत्साहात साजरा*
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त) कट्टा येथे नौसेना जनजागृती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमात कमांडर अंकेश मुंडेला यांचे स्वागत सचिव श्री सुनीलजी नाईक यांनी केले लेफ्टनंट गौरव यादव यांचे स्वागत सचिव श्रीमती विजयश्री देसाई यांनी केले लेफ्टनंट अच्युत यांचे स्वागत स्कूल कमिटी चेअरमन श्री सुधीर वराडकर यांनी केले प्रास्ताविक सौ डी डी गावडे यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी लेफ्टनंट गौरव यादव यांनी विद्यार्थ्यांना भारतीय नौसेना भरती प्रक्रिया प्रवेश प्रक्रिया याबद्दल मार्गदर्शन करताना भारतीय नौसेनेमध्ये भरती होण्याचे आवाहन करताना देश भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला यावेळी चित्रफीत च्या माध्यमातून भारतीय नौसेना माहिती व कामगिरी व यशस्वीता, गौरव ,परंपरा यांची माहिती देण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील तरुणांना असलेल्या संधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या योगदानाबद्दल तसेच आरमार प्रमुख कन्होजी आंग्रे यांच्या बद्दल माहिती देण्यात आली भारतीय नौसेना मध्ये मुलींच्या बाबतीत असणाऱ्या संधी याबाबत ही जागृती करण्यात आली यावेळी भारतीय नौसेनेचे अधिकारी
शिवाजी पाटील, योगेश गायकवाड, शुभम पाटील, मंगेश दळवी , उपस्थित होते कार्यक्रमाचे औचित्य साधून भारतीय नौ सेनेतर्फे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई सचिव श्री सुनील जी नाईक स्कूल कमिटी चेअरमन श्री सुधीर वराडकर तसेच मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे यांच्या उपस्थितीत कान्होजी आंग्रे यांचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून देण्यात आले.भेटवस्तू त्याचबरोबर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने भारतीय नौसेनेतील अधिकारी व स्टार यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका देवयानी धनंजय गावडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार श्री संजय पेंडुरकर सर यांनी मांडले