*कोंकण Express*
*शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा उद्या होणार वाढदिवस साजरा*
*कणकवलीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा युवानेते संदेश पारकर यांचा 14 जुलै रोजी वाढदिवसानिमित्त सामाजिक, कला क्रीडा, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
रविवार दि. 14 जुलै 2024 कणकवली तालुक्यात भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कै. सुबोध टिकले स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर, सकाळी 10 ते 11 गुणवंत विद्यार्थी सत्कार, सकाळी 11 ते 12 वी मध्ये १०० टक्के निकाल देणाऱ्या शिक्षण संस्थांचा सन्मान, दुपारी 12 ते 1 शिवसैनिकांचा सत्कार आणि छत्री वाटप, दुपारी 1 वाजता केक कापणे व शुभेच्छा कार्यक्रम होणार आहे.
या वाढदिवस सोहळ्याला शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्क अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, उपनेते आमदार राजन साळवी, उपनेते गौरीशंकर खोत, उपनेत्या महिला जिल्हाप्रमुख, जान्हवी सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, विधानसभा प्रमुख सतिश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महाविकास आघाडी नेते, जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी सिंधुदुर्ग जिल्हातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या सर्व तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, सर्व सेलचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि संदेश पारकर प्रेमींनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन निलम पालव, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, रुपेश नार्वेकर, मंगेश लोके, मिलिंद साटम, जयेश नर यांनी केले आहे.


