*कोंकण Express*
*कनेडी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संस्थेला ७० वर्षे पूर्ण झाले असून संस्थेला एकत्र ठेवण्याचे काम अध्यक्ष सन्मा. श्री. सतीश सावंत यांनी केले त्यामुळे ही संस्था जिल्ह्यामध्ये नावारूपास येत आहे. संस्थेसाठी सर्व संचालकांनी ही मोठे योगदान दिले आहे. सर्व संचालक, माजी विद्यार्थी यांच्या एकत्रित विचाराने चालणारी ही एकमेव संस्था आहे या संस्थेची पुढील वाटचाल निश्चितच यशस्वी होईल.
विद्यार्थ्यांनीही जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेत उतरले पाहिजे. परीक्षांची चांगली तयारी केली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे माहेरघर या संस्थेच्या प्रशालेमध्ये दिसून येते. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांचा त्रिवेणी संगम या प्रशालेने विद्यार्थ्यांना दिला आहे. जीवनात जे काही बनाल ते सर्वोत्तम बना असा मौलिक संदेश खासदार सन्मा.श्री.अरविंद सावंत यांनी दिला.
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचा ७० वा वर्धापन दिन, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, “उगम बहुविध कौशल्य अभ्यासक्रम लॅब” उद्घाटन सोहळा, नीती आयोग भारत सरकार द्वारा प्राप्त अटल टिंकरिंग लॅबला भेट, सुसज्ज व्यायाम शाळेला भेट व विद्यार्थी गुणगौरव समारंभ सोहळा रविवारी झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सन्मा.श्री.अरविंदजी सावंत, सन्मा.श्री.श्रीकृष्ण सावंत, सुप्रसिद्ध गीतकार व संगीतकार भिरवंडे, सुझा रासम आणि कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट सन्मा. श्री. तुकाराम रासम, सन्मा. श्री. शशिकांत सावंत, ठाणे- रायगड – पालघर निवासी संपादक, दैनिक पुढारी उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सन्मा. श्री.सतीश सावंत हे होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाली. तदनंतर खासदार अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते “उगम बहुविध कौशल्य अभ्यासक्रम लॅब” उद्घाटन करण्यात आले. इ.१० वी व १२ वी परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा, संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त १ विद्यार्थ्यांचा आणि क्रीडा व स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
प्रशालेचे पर्यवेक्षक, क्रीडा शिक्षक श्री.बयाजी बुराण व एम.एम. साटम मॅडम यांनी शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून सुयश संपादन केल्याबद्दल त्यांचा गुणगौरव पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे सरचिटणीस सन्मा.श्री.शिवाजी सावंत, सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समितीचे चेअरमन सन्मा. आर.एच.सावंत, सर्व शालेय समिती सदस्य,श्री.नागेश सावंत, श्री.एंगेल डिसोजा, श्री.संजय सावंत,श्री.प्रथमेश सावंत,श्री. योगेश सावंत,श्री.सुधीर सावंत, माजी विद्यार्थी, पत्रकार बंधू , प्रतिष्ठित नागरिक, माजी प्राचार्य श्री.ए.एस.सावंत, मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
प्रस्ताविक संस्थेचे सरचिटणीस सन्मा.श्री.शिवाजी सावंत तर आभार शालेय समितीचे चेअरमन सन्मा.श्री.आर.एच. सावंत यांनी केले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रसाद मसुरकर सर व पी.एल.हाटले मॅडम यांनी केले.

