*कोकण Express*
*भालचंद्र बाबांच्या नामाचा जयघोष दुमदुमला….!*
*भल्या पहाटेपासून भक्तीचा मळा फुलवत जन्मोत्सव सोहळा साजरा….!*
*सायंकाळी पालखी मिरवणूक ; रात्रीच्या दैनंदिन आरतीने होणार सांगता…..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ११७ व्या जन्मोत्सवाचा प्रमुख दिवस.समाधी स्थळी आकर्षक ‘नयनमनोहर’ अशी सजावट करण्यात आली होती. पहाटे नित्यपूजेने बाबांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या मुख्य दिवसाची सुरुवात झाली.कोरोनाच्या काळात हि अबालवृद्धाच्या उपस्थितीत सकाळी पहाटे काकड आरती पासूनच हजेरी लावली.भालचंद्र बाबांच्या नामाचा जयघोष करत सायंकाळी मंदिर परिसरातच सवाद्य पालखी मिरवणुक व रात्रीच्या नित्यआरतीने या जन्मोत्सवाची सांगता होणार आहे.दुपारच्या जन्मोत्सव सोहळ्याला हि मोठी गर्दी पहावयास मिळाली. या उत्सवास भक्तांनी हि कोरोना संसर्ग वाढू नये यादृष्टीने मास्क,शारीरिक अंतर पाळत उत्सवात सहभाग घेतला. परमहंस भालचंद्र महाराज यांचा ११७ व्या जन्मोत्सवास गेले चार दिवस धार्मिक व भक्तीमय वातावरणात पार पडला. आजच्या शेवटच्या म्हणजेच जन्मोत्सवाचा प्रमुख दिवशी भाविक भक्तांनी हजेरी लावत बाबांच्या चरणी नतमस्तक झाले. सकाळी जपानुष्ठान,सकाळी समाधीस्थानी लघुरूद्राभिषेक तसेच भालचंद्र महाराज व्यासपीठावर जन्मोत्सव किर्तन ह.भ.प. भाऊ नाईक (वेतोरे-वेंगुर्ले) यांचे झाले.व्यवस्थापक विजय केळुसकर यांनी भालचंद्र महाराज संस्थांची माहिती तसेच नियोजित कायमस्वरुपी मंडपउभारणी बाबत माहिती देत.पालकमंत्री उदय सामंत यांचे विशेष आभार मानले.संस्थांनला वेळोवेळी मदत करणार्या भक्तांचे हि आभार मानत सविस्तर विवेचन केले. दुपारी संस्थान अध्यक्ष सुरेश कामत,व्यवस्थापक विजय केळुसकर तसेच ब्रम्हवृन्द यांच्या हस्ते बाबांची मूर्ती पाळण्यात घालत.बाबांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.उपस्थित सुहासिनीनी पाळणा गीत म्हटले तर या जन्मोत्सव ठिकाणी कमानी तसेच पाळण्याला सजावट करण्यात आली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांनी याची देही याची डोळा हा जमोत्सव पाहत सोहळा डोळ्यासोबतच मोबाईल मध्ये साठवला. तद्नंतर मंदिरपरिसरात देवतांचे दर्शन घेतले.गाऱ्हाणे व दुपारची आरती,दर्शन सोहळा,सायंकाळी सुश्राव्य भजने सुरू असून भजनांतून जिल्हयातील बुवा आराधना करत आहेत. सायंकाळी ठीक ५ वा.भालचंद्र संस्थान ते हनुमान मंदिर अशी सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून यामध्ये हि भक्तांनी कोरोना बाबतचे नियम पाळने आवश्यक आहे. असे संस्थांच्यावतीने अध्यक्ष सुरेश कामत यांनी सांगितले.तर दैनंदिन आरतीने या उत्सवाची सांगता होणार आहे.