*कोंकण Express*
*बॅ नाथ पै बीएड महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रम समाजाभिमूक*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
शिक्षण हे समाजा पर्यत पोहचले पाहिजे समाज परिवर्तनाची ताकद शिक्षणात असते म्हणून बॅ नाथ पै बीएड महाविद्यालयात अध्यापन करण्यात येणारे सर्व अभ्यासक्रम शाळा महाविद्यालयातील अध्यापक व प्राध्यापक यांच्या पर्यंत प्रत्यक्ष पोहचविण्यासाठी प्राध्यापक अरुण मर्गज सर व प्राध्यापक नितीन बांबर्डेकर सर यांनी कणकवली ‘तळेरे ‘ कासार्डे ‘ पणदूर येथिल शाळा कॉलेजना भेट देवून महाविद्यालयात राबविण्यात येणारे अभ्यासक्रम व त्यांचे महत्व या विषयी मार्गदर्शन केले बॅ नाथ पै बीएड कॉलेज हे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्श महाविद्यालय आहे सर्व गुणसंपन्न असणारे प्राध्यापकवर्ग आहेत भौतिक सुविधांनी युक्त असणारे महाविद्यालय सर्वसामान्य विद्यार्थ्यासाठी महत्वपूर्ण योगदान देत आहे या महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे रोजरा भिमुख विविध कोर्स राबविले जातात सेवेत असतांना सुद्धा अनेकांना हे कोर्स सुलभ रित्या करता येतात शिक्षकांना /प्राध्यापकांना आपली सेवा बजावून सुट्टीच्या कालावधित डीएसएम ही पदवीका अभ्यासक्रम एक वर्षाचा कालावधी असणारा कोर्स पूर्ण करता येतो तसेच आपल्या कार्याचा ठसा उमटविता येतो एमए शिक्षणशास्त्र हा दोन वर्षाचा शिक्षणक्रम आदर्श आहे सध्या योग टिचर हा अभ्यासक्रम ही महत्वाचा आहे आज योग विद्या सर्वत्र प्रसारित आहे . असे विविध कोर्स या महा विद्यालयात शिकविले जातात . ज्यांना कोणाला हे अभ्यासक्रम शिकून घ्यायचे असतील तर प्राध्यापक नितीन बांबर्डेकर सरांना संपर्क साधावा आणि आपला प्रवेश निश्चित करावा .