*कोंकण Express*
*मुस्लिम विकास मंच, सिंधुदुर्ग द्वारा कणकवली येथे उद्योग व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन, कृषी, कृषी पुरक, फळप्रक्रिया, अन्नप्रक्रिया अशा विविध क्षेत्रांत अनेक उद्योग संधी असून याचा परिपूर्ण अभ्यास करून, योग्य ते प्रशिक्षण घेऊन या संधीचा लाभ युवकांनी घ्यायला हवा, जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होतील. याबाबत माहिती सुशिक्षित बेरोजगार युवा वर्गाला व्हावी या दृष्टीकोनातून मुस्लिम विकास मंच, सिंधुदुर्ग या संस्थेद्वारा कणकवली येथे उद्योग/व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमाचे कणकवली येथे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात तरुणांनी उद्योग/व्यवसायाकडे का वळावे ?, उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे टप्पे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या उद्योग व्यवसायातील अनेक संधी, शासकिय योजनांची माहिती इ. विषयावर मुरादअली शेख यांनी मार्गदर्शन करून नोकरीच्या शोधात जास्त वेळ न दवडता
जास्तीत जास्त तरुणांनी उद्योजकतेची कास धरावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रौनक पटेल यांनी केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष निसार अहमद शेख यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली तर सचिव एड अश्फाक शेख, सदस्य निसार काझी, अस्लम निशानदार, झाकीर पटेल आदींनी आपले मनोगत व्यक्त केलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुशिक्षित बेरोजगारांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन समाधान व्यक्त केले व स्वत:चा उद्योग/व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.
ज्यांना उद्योग व्यवसाय सुरू करायचे असतील त्यांना यापुढेही अशाप्रकारचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
लवकरच नियोजनबद्ध कार्यक्रम राबवून युवा वर्गामध्ये उद्योजकिय मानसिकता तयार व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे संस्थेद्वारा जाहीर करण्यात आले.