*कोंकण Express*
*संजू परब धावले व्यापाऱ्यांच्या मदतीला*
*बाजारपेठेतील तुंबलेली गटार तात्काळ घेतली साफ करून; व्यापाऱ्यांनी मानले आभार…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शहरात कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची दाणादाण उडाली होती यावेळी सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी घटनास्थळी धाव घेत व्यापाऱ्यांच्या मदतीला धावले आहेत.
त्यांनी तात्काळ नगरपालिका कर्मचाऱ्यांना बोलून घेत बाजारपेठेत तुंबलेली गटारे साफ करून घेत पाणी जाण्यास मार्ग मोकळा करून दिला त्यांनी दाखवलेल्या या कार्यतत्परतेमुळे बाजारपेठेतील सर्व व्यापाराने तसेच नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.यावेळी आंनद नेवगी, उमेश साळगावकर आदी उपस्थित होते