अयोध्या राममंदिर निर्माणासाठी श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान

अयोध्या राममंदिर निर्माणासाठी श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान

*कोकण Express*

*अयोध्या राममंदिर निर्माणासाठी श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान…*

*कणकवली पटकीदेवी येथून राम रथाचे प्रस्थान;.भाजपा आम.नितेश राणे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून हा राम रथाचा शुभारंभ..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

अयोध्या राममंदिर निर्माणासाठी श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान जिल्हयात आज सुरू आहे.या पार्श्वभूमीवर आज कणकवली पटकीदेवी येथून राम रथाचे प्रस्थान झाले.भाजपा आम.नितेश राणे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून हा राम रथ जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात निधी संकलनासाठी रवाना झाला.


रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्यातील हा रथ कणकवली शहरात दाखल झाला आहे.या शुभारंभा प्रसंगी नगराध्यक्ष समीर नलावडे,माजी जि. प.अध्यक्ष गोट्या सावंत,सभापती मनोज रावराणे,विश्व हिंदू परिषद तालुकाध्यक्ष नंदकुमार आरोलकर,संघाचे कार्यवाह सुदेश राणे,दत्तप्रसाद ठाकूर,रवींद्र तांबोळकर,सुनील सावंत,श्रीकृष्ण वायगणकर,जितेंद्र चिकोडी यासह तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुकाध्यक्ष संतोष कानडे,नगरसेवक अभिजित मुसळे,संजय कामतेकर,शिशिर परूळेकर,शहराध्यक्ष अण्णा कोदे,नगरसेविका प्रतीक्षा सावंत,अशोक करंबेळकर, विठ्ठल देसाई, संदीप मेस्त्री,महेश सावंत,बबलू सावंत,समर्थ राणे,राजन परब,प्रकाश पारकर,किशोर राणे,बंडू गांगण,नितीन पाडावे, पप्पू पुजारे,सुजाता हळदिवे,शहराध्यक्ष प्राची कर्पे,संजय ठाकूर सरचिटणीस पंढरी वायगंणकर,हर्षदा वाळके,प्रकाश पारकर,भाई मोरजकर, आयनल सरपंच बापू फाटक,असलदे उपसरपंच संतोष परब,प्रकाश सावंत,राजू पेडणेकर,आदीसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पटकीदेवी बाजरपेठ मार्गे -पटवर्धन चौक एस.टी.स्टँड पर्यंत जाणार आहे.यामध्ये नागरिकांनी सहभागी होवून आपापल्या परीने मदत निधी देत सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!