माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

*कोंकण EXPRESS*

*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न*

*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे वार- सोमवार, दिनांक- ०१ जुलै २०२४ रोजी प्रशालेत गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी वह्यांचे वितरण करण्यात आले.*

*युवा संदेश प्रतिष्ठाण- नाटळ, सांगवे आयोजित व शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी, शैक्षणिक क्षेत्रातील आधारवड, जिजाऊ सामाजिक संस्था, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सालाबादप्रमाणे याही वर्षी इयत्ता दहावी आणि बारावी मधील प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा डिजिटल वॉच देऊन त्यांचा गुण गौरव करण्यात आला तसेच प्रशालेतील एकूण ७५० विद्यार्थ्यांना प्रत्येकी अर्धा डझन वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. युवा संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मा. श्री.संदेशजी सावंत साहेब, (संचालक, क.ग.शि.प्र. मंडळ, मुंबई) प्रशालेचे माजी विद्यार्थी, भिरवंडे गावचे सुपुत्र, कार्यक्रमाचे सर्वेसर्वा यांच्या उदात्त हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,आपण ज्या शाळेत शिकलो ज्या समाजातून आलो त्या समाजाचे आपण देणे लागतो. त्यासाठी शैक्षणिक,सामाजिक, कला, क्रिडा, सांस्कृतीक, एस.टी.एस स्पर्धा परीक्षा यांच्या माध्यमातून अविरतपणे समाज कार्य व प्रयत्न युवा संदेश प्रतिष्ठान नेहमीच अग्रक्रमाने करत असते.*

*या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सन्मा.सौ.संजना सावंत (जिल्हा परिषद , सिंधुदुर्ग), श्री.संजय सावंत, श्री.सुरेशजी सावंत, श्री.रॉबर्ट डिसोजा, श्री.प्रफुल्ल काणेकर, श्री.प्रदीप सावंत, श्री.विजय भोगटे ,श्री.मंगेश बोभाटे, श्री.अशोक कांबळे, श्री.विनय सावंत, युवा संदेश प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी,पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच,सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बंधू, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक मा.श्री. बयाजी बुराण, तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यी उपस्थित होते*.

*कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन व आभार मा.श्री. प्रसाद मसुरकर (सहा. शिक्षक) यांनी केले*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!