*कोकण Express*
*सभापती सौ.मानसी धुरी यांच्या हस्ते इन्सुली जि.प.शाळा नं. ४ च्या नुतन इमारतीचे उद्घाटन..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
इन्सुली जि.प.शाळा नं. ४ च्या नुतन इमारतीचे उद्घाटन सभापती सौ. मानसी धुरी यांच्या हस्ते करण्यात आले. सभापती सौ. मानसी धुरी यांच्या अथक प्रयत्नांतून व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. रेश्मा सावंत यांच्या सहकार्याने मंजूर झालेल्या इन्सुली जि.प. शाळाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन सावंतवाडी पंचायत समिती सभापती सौ.मानसी धुरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण व आरोग्य सभापती सौ. सावी लोके, माजी जि प अध्यक्ष व विद्यमान जि.प. सदस्य सौ. रेश्मा सावंत, जि.प. सदस्य सौ. उन्नती धुरी, पंचायत समिती उपसभापती श्री.शितल राऊळ, शिक्षण विस्तार अधिकारी सौ. कोरगावकर, भाजप बांदा मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. तात्या वेंगुर्लेकर, सौ. नमिता नाईक, माजी सरपंच श्री. नंदु पालव, प्रशासक प्रशांत चव्हाण, केंद्रप्रमुख ठाकुर मुख्याध्यापक आरेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समिर गावडे, पोलिस पाटील जागृती गावडे, ग्रामविकास अधिकारी श्री. चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी, मोहन पालव गुरुजी, विजय गावकर, नितीन मुळीक, संदेश पालव, दिनेश गावडे, अरविंद जाधव व गावठणवाडीतील प्रतिष्ठित नागरिक, पालक, शिक्षक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण व आरोग्य सभापती सौ. सावी लोके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.