*कोंकण Express*
*वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीला कै.वसंतराव नाईक शेती केंद्रीत ग्रामपुरस्कार मिळाल्या बद्दल भाजपा च्या वतीने सत्कार*
*भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते आजी व माजी सरपंचांचा सत्कार*
१ जुलै २०२४ रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ वा जन्मदिन व कृषी दिना निमित महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीला कै.वसंतराव नाईक शेती केंद्रीत ग्राम पुरस्कार जाहीर झाला. १ जुलै २०२४ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .वसंतराव नाईक कृषी संशोधन व विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या मार्फत दिला जाणारा हा ग्रामस्तरावरील उल्लेखनीय उपक्रमांबद्दलचा पुरस्कार परुळेबाजार ग्रामपंचायतीला प्राप्त झाला .
१ जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ वा जन्मदिन व कृषी दिना निमिताने मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास मा श्री धनंजय मुंडे कृषिमंत्री , मा. प्रशांतकुमार गुलाबाराव पाटील, कुलगुरु महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला . या प्रतिष्ठानमार्फत विविध स्तरावर कृषी व ग्राम पातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था व्यक्ति यांना सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा ग्रामस्तरांवरील बहुमान ग्रामपंचायत परुळेबाजार ला प्रदान करण्यात आला .
याबद्दल भाजपा च्या वतिने जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रभारी सरपंच राजु दुधवडकर व माजी सरपंच प्रदिप प्रभु यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई , जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , माजी सभापती घनश्याम उर्फ निलेश सामंत , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , कुशेवाडा सरपंच निलेश सामंत , बुथ प्रमुख गणपत माधव , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , सुधिर ठाकुर , ग्रा.पं.सदस्य सीमा सावंत , सुधिर पेडणेकर इत्यादी उपस्थित होते .