*कोंकण Express*
*जानवली नदीवरील नव्या पुलावरून वाहतूक सुरू*
*चार महिन्यांत काम पूर्णत्वास : वाहतुकीसाठी नवा मार्ग खुला*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जाणवली नदीपत्रातील नव्या पुलाच्या जोड रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या पुलावरून आता वाहतूक सुरू झाली आहे त्यामुळे जाणवली कणकवली नागरिकांना वाहतुकीसाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे अवघ्या तीन महिन्यात या पुलाचे काम पूर्ण झाले महिनाभर पुलाच्या दोन्ही बाजूच्या जोड रस्त्याचे काम सुरू होते.
कणकवली आणि जाणवली या दोन गावांना जोडणाऱ्या जाणवली नदीपत्रातील मोठ्या पुलाच्या बांधकामाला नऊ मार्च रोजी प्रारंभ करण्यात आला होता तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या पुलाचे गर्डर आणि स्लॅब चे काम पूर्ण करण्यात आले होते त्यानंतर सतत पावसाचा अडथळा येत असल्याने दोन्ही बाजूच्या जोड रस्त्याचे काम रखडले होते मात्र गेल्या दोन-चार दिवसात हे काम पूर्ण केले त्यानंतर या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे जाणवली पुलासाठी राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात आठ कोटी आठ लाखांचा निधी मंजूर केला तर 9 मार्च रोजी पुलाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करून त्यानंतर ठेकेदाराने दिवसरात्र काम सुरू ठेवून अवघ्या तीन महिन्यात पुलाचे काम पूर्ण केले जाणवली नदीपत्रात उभारणी झालेला हा पूल 80 मीटर लांब आणि 11.67 मीटर रुंदीचा आहे या पुलावर पादचाऱ्यांना जे येणारे जाणारे आहेत त्यांना दोन्ही बाजूंनी स्वतंत्र ट्रॅक ठेवला आहे
जाणवली, साकेडी करूळ फोंडाघाट उमरट या आधी गावांना कणकवली येण्यासाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा एकमेव मार्ग होता आणि कणकवलीवासीयांना लगतच्या गावासाठी जाण्यासाठी महामार्गावरून जावे लागत होते परंतु आता जाणवली नदीवरील नव्या पुलामुळे येथील रहिवासांना जवळचा आणि नवा मार्ग खुला झाला आहे नव्या जाणवली पुलापासून काही अंतरावर शहराचा रिंग रोडचे दोन टप्पे पूर्ण केले आहेत तर तिसरा टप्पा ही पुढील दोन वर्षात पूर्णत्वाच येणार आहे त्यामुळे संपूर्ण शहरवासीयांना जाणवली नदीपत्रातील नव्या पुलाचा वापर करता येणार आहे तसेच नव्या जाणवली कणकवली नगरपंचायतीच्या वतीने कृत्रिम धबधब्याची उभारणी केली जात आहे. यामध्ये पाणी साठवण टाकी आणि शुद्धीकरण यंत्र कार्यन्वित झाल्यानंतर येथील धबधब्याची सुरुवात होईल यामुळे शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटनातही आणखीन भर पडणार आहे.

