*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते हरकुळ सोसायटी हॉलचे भूमिपूजन..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
हरकुळ बुद्रुक वि. सह. का. सेवा सोसायटी लि., हरकुळ बुद्रुक हॉलचे भूमिपूजन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. या हॉलचे बांधकाम सोसायटीच्या माध्यमातून व हरकुळ बुद्रुक मधील ग्रामस्थ यांच्या सहकार्यातुन होणार आहे. यावेळी चेअरमन डॉ. अनिल ठाकूर, व्हाईस चेअरमन दिगंबर सापळे, माजी चेअरमन दिवाकर पारकर, माजी सरपंच आनंद ठाकुर, संचालक हुसेनशाहा पटेल, ल.गो. सामंत विद्यालय चेअरमन ओमप्रकाश ताम्हणेकर, संचालिका विदया खोचरे, माजी चेअरमन नादिरशहा पटेल, आयुब पटेल, संचालक लियाकत पटेल, संचालक नित्यानंद चिंदरकर,दिलीप कासले,माजी पोलीस पाटील सुरेश गोसावी, मोहन सोहनी, फैयाज खान, सुनील वाळके, दादा भोगटे,अल्लीशा पटेल, वामन मेस्त्री उपस्थित होते.