*कोंकण Express*
*रिक्षा चालक मालकांच्या वतीने संतोष सावंत यांचा वाढदिवस साजरा*
*कणकवली ः प्रतिनिधी Express *
ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचा बुलुंद आवाज संतोष सावंत यांचा वाढदिवस कणकवली रेल्वे स्टेशन गोठवदेव या ठिकाणी साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व रिक्षा चालक मालकांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संतोष सावंत म्हणाले, रिक्षा चालक मालकांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन तसेच कणकवली शहरातील रिक्षा संघटना मजबूत करून रिक्षा चालक मालकाला हक्काचे स्थान देण्याचा प्रयत्न राहील. आणि रिक्षा चालक मालकां साठी अनेक उपक्रम राबविण्यात येतील अशी ग्वाही श्री सावंत यांनी दिली.